About Talathi Exam 2015

Unknown   at  11:15 pm  

तयारी परिक्षेची

तलाठी परीक्षेविषयी

परीक्षेसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमार्यादा व इतर माहिती:                  
                   राज्यातील प्रयेक जिल्हातील जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिती तर्फे तलाठी (गट-क) या पदासाठी अर्ज मागविण्यात येतात.या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे मराठीचे ज्ञान असण्यासोबतच संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.हि परीक्षा उत्तीर्ण नसणाऱ्या उमदेवारांना नियुक्ती नंतर दोन वर्षाच्या आत ती परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. १८ ते ३३ वर्षापर्येंतचे उमेदवार तलाठी पदासाठी अर्ज करू शकतात.आरक्षित घटकांसाठी वयोमर्यादा शिथिलक्षम आहे.
परीक्षा कधी होऊ शकते:                    
                       जिल्हा निवड समिती या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४० ते ५० दिवसानंतर परीक्षा घेतली जाते. इच्छुक विद्यार्थानी आधीपासुनच परीक्षेच्या तयारीला लागाव.मार्गदर्शनासाठी अनेक पुस्तक उपलब्ध आहेत. या पुस्तकांच्या आधारे नियोजनबद्ध आभ्यास करून विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रवेश करू शकतात.
पेपर कसा व किती गुणांचा आसेल:
                      तलाठी परीक्षेचा पेपर वास्तुनिस्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असतो. परीक्षेत १०० प्रश्न विचारले जातात.एकूण २०० गुणांच्या पेपरसाठी दोन तासाचा कालावधी असतो. मराठी, इंग्रजी ,सामान्य ज्ञान आणि बौध्दिक चाचणी अशा चार विषयावरप्रत्येकी ५० गुण असतात. तलाठी परीक्षेत पदवी स्तरावरील प्रशन विचाले जातात. तर मराठी विषयावरील प्रश्न १२ स्तरावरचे असतात.
अभ्यासक्रम विषयक उमदेवारांचा अनुभव:
परीक्षेची तयारी करताना मराठी आणि सामान्य ज्ञान हे विषय सोपे वाटत असले तरी इंग्रजी व बौध्दिक चाचणी हे काहीसे अवघड वाटतात, असा उमेदवारांचा अनुभव आहे.
                         पण या विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये. सामान्य ज्ञानात महाराष्ट्राचा भूगोल ,राज्याची इतर माहिती,आधुनिक भरताचा इतिहास ,चालू घडमोडी अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात.त्यामुळेभरपूर वाचन ही या परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.हे लक्षात ठेवा.

About the Author

Write admin description here..

Blogger templates. Proudly Powered by Gyan.
Blogger Widgets